तुझ्या आठवणींत

मनोगत

आठवणींमध्ये खूप ताकद असते. आयुष्यभरही एकटे जगण्याचे सामर्थ्य ही आठवण देते. नजरेला दिसत नसली तरी ही आठवण एवढी जवळीक साधते कि जणू प्रेयसीच होउ पहाते.

कवीच्या मते असे “दृष्ट लागण्याजोगे” प्रेम मिळवण्याची त्याची पात्रता नव्हती. केवळ प्रेयसीची कृपा दृष्टी पडली आणि त्याला भर-भरून प्रेम मिळाले. पण “दृष्ट लागण्याजोगे” होते ते, त्याला दैवाची आणि लोकांची दृष्ट लागलीच. प्रेयसीला कवीपासून हिरावली आणि दुरावली ते हि कपटाने. उशिरा का होई ना कवीने हा कपट ओळखला. प्रेयसीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी तिला शोधली, परत बोलावली. यांत नाती दुरावली, कर्तव्ये त्यागली, हाल अपेष्टा सहन केल्या. पण उपयोग शून्य.

मात्र तरी ही कवी हरला नाही. प्रेयसीची आठवण त्याने तशीच ह्रिदयात ताजी ठेवली. तिच्या आठवणीत राहून एकतर्फी संवाद साधला. आठवणीला तो एवढा गुरफटून बसला कि ही आठवण त्याची जणू दुसरी प्रेयसी होते. या दुसर्‍या प्रेयसीच्या सानिध्यात तो आयुष्यही काढायला तयार आहे. कवीची ही सारी खटाटोप प्रेयसीशी एकतर्फी संवादामार्फत “तुझ्या आठवणींत” मांडलेली आहे.

“तुझ्या आठवणींत” चे आणखी एक विशेष म्हणजे या काव्यसंच्यातील ५० कवितांपैकी प्रत्येक कवितेत “आठवण” हा शब्द किमान एकदा तरी आहेच.

तर बघू या कवी आपल्या प्रेयसीला एकतर्फी संवादातून “तुझ्या आठवणींत” काय काय सांगतो ते.

तुझ्या आठवणींत
अनुक्रमणिका
अ. क्र. पहिली ओळ शिर्षक
थोडे तरी पाठचे आठव वादळ
तिथेच आहे उभा सभा
तुझा आवाज ऐकायला तरसलेत कान पकड माझी दिशा
तुझ्या आठवणींवर आवर घाल आठवणींवर आवर घाल
तुझ्या विरहात काय काय सोसले आठवणीशी लग्न
तुला त्रास दिल्याचे मानतो मागतोय माफी
शक्य असल्यास मोज शक्य असल्यास
सोसवत नव्हती साधी साधी कळ प्रेमातील कळ
तुझे चाहते स्मार्ट बरेच निवड
१० आठवण तुझी येते सारखी आठवण तुझी
११ आठवण आजही आहे ताजी आठवण आजही आहे ताजी
१२ अवघड हा प्रितीचा घाट प्रितीचा घाट
१३ एकदा हळूच ये स्वप्नी आठवणींपासून सुटका
१४ गेलीस हसत फसउन नाही ना
१५ कधी बनू नाही शकलो सेठ सेठ
१६ कशी झाली समजूत मनाची मदत
१७ कशी नाही आठवण येणार कशी नाही आठवण येणार
१८ कष्ट सोसतोय अज्ञानात फळ चाललेलेच वाटते उत्कृष्ट
१९ कोण म्हणतो आपण दुरावलो आठवणीतून नाही हरवलो
२० माझ्या खुशीत असायची तुझी ख़ुशी आभार
२१ मित्र कुचकामी ठरले दे मदत
२२ नाही मागत ह्रिदयात जागा धागा
२३ नाती सारी दूर सरली घोर
२४ नियतीच्या तलवारीला आहे बरीच धार नशिब
२५ सांग कुठे आवडेल भेटायला येणे सांग
२६ सोबत घेऊन तुझ्या आठवणींचा सुवास दंड
२७ सोसवत नव्हती साधी साधी कळ तुझी भक्ती
२८ तारुण्यही निट नाही पहिले सन्यास
२९ आपली सोबत टिकली ना जास्त आपली सोबत
३० बर्‍याच जडल्यात व्याधी व्याधी
३१ एकदाच दाखव पाऊल-खुणा पाऊल-खुणा
३२ कळे ना कोणती राहिली कसर राहिली कसर
३३ लिहून देऊ कि सांगू तोंडी नको करू घोर
३४ सार्‍यांचेच पकडले पाय न्याय
३५ आजही कायम आहे हट्ट हट्ट
३६ एकदा मनात बघ विचार आणून पुन्हा एकदा
३७ कसे तुला विरहाचे पटले विरहा विरुद्ध
३८ आता तर आशाच झाले धुसर धुसर
३९ भयंकर लागले हि आग आग
४० भले गेलीस विरहाशी नाते जोडून नाते नवे
४१ केले तुझ्या प्रेमाचे जतन प्रेमाचे जतन
४२ तुझी आठवण सतावते फार काळजी
४३ तुझ्या शोधात नेहमीच राहिलो दक्ष लक्ष
४४ जेवताना अडकतोय घास प्रश्न
४५ नाही वाटत ना तुला गम्मत किंमत
४६ आयुष्य आहे खूप मोठे आयुष्य
४७ असे काय लागलय तुझ्या हाती आठवणीची लुट
४८ मी डोळे बंद करतो शोधून काढेन
४९ प्रश्न आहे खूप मोठे आठवायची कारणे
५० तुझी आठवण आहे खूप दुष्ट आठवणीचा प्रियकर