सेठ

कधी बनू नाही शकलो सेठ,
अडून राहिलो घडवण्यावर पुनर्भेट,
एकच धरून राहिलो ध्यास,
पोहोचलोच नाही धनाच्या आस पास.

खूप वेळ तुला शोधण्यात घालवतो,
थोडा वेळ देवाला आळवतो,
थोडा वेळ तुझ्या स्वप्नांना देतो,
आठवतो काय आहे आणि काय होतो.

दर दिवसाचे हे क्रम,
तुझ्यावरच खर्चीतो सारे श्रम,
पण शेवटी काहीच लागत नाही हाती,
हिसाब हि नसतो आले गेले किती.

पण या सार्‍याची नाही मला हाव,
हवाय केवळ तुझा ठाव,
त्यासाठी तयार सारे गमवायला,
पुढे आयुष्य पडलय कमवायला.