हट्ट

आजही कायम आहे हट्ट,
तुझी आठवण धरले घट्ट,
होतात थोडे कष्ट,
दैव अजून आहे रुष्ट.

लहान बाळासारखे केलेस लाड,
मीच असायचो नजरे समोर नि आड,
म्हणूनच काय स्वतःवर घेतलेस सारे,
थोडे तरी सांगायचेस जाण्याआधी खरे.

तुझ्याशिवाय जगणे नव्हते जमत,
पण तन – मनात होती हिम्मत,
ज्या जोरावर आजही आहे तुझा हट्ट,
भले दुर्दैव किती हि असो लठ्ठ.