नसेल संपले असेल जपले

भर-भरून प्रेम दिलास,
काय आता झालाय सारा खलास,
का अशी अंत पाहतेस ?
का अशी दुरावून राहतेस ?

कधीच गेली नाहीस दूर,
मी ही कधी झालो नाही शूर,
सोडली ना तुझी छत्र छाया,
कळली ना जगाची भकास माया.

तू दुरावल्यावर सारं झालं उघड,
पण जगणं झालं अवघड,
या जगण्याची सवय नव्हती,
तुझी प्रीत होती अवती भोवती.

त्याच प्रीतीची गरज आहे पुन्हा,
शोधतोय तुझ्या खाना खुणा,
आहे विश्वास नसेल काहीच संपले,
ते प्रेम तू आजही असेल जपले.