पंख

एकच एक लावले रट,
तुझ्याप्रमाणे मीही सोडला नाही हट,
आजही वाट बघतोय कालप्रमाणे,
बघूया काय जिंकता येते प्रेमाने,

आधी प्रेमाने जिंकले तुझे मन,
पण गर्वाने गगनी व्हायला लागला गमन,
कळले जेव्हा दैवाने पंख छाटले,
पण तोवर तुझे हात हातून होते सुटले.

मन पडले, डोळे रडले,
तरी दोघे तुझ्या प्रेमावर अडले,
खूप शोधले तुला आवरून सारा शोक,
पण नियतीचा बंदोबस्त ही होता चोख.

आज पुन्हा जाणवते तुझ्याच मदतीची गरज,
ढासळू नको देऊ सांभाळलेला धीरज,
केवळ साद दे मारलेल्या हाकांना,
पुन्हा जमा करेन दैवाने छाटलेल्या पंखांना.