बघतोय वाट

नाही येत जादू मंतर,
नाही कळत आपल्यातील अंतर,
शोधतोय तुला जसा जमतो,
भेटत नाहीस खूप दमतो.

पण दमून बसत नाही स्वस्त,
तुझ्या ओढीने थकव्याचा होतो अस्त,
पुन्हा तीच सुरु होते वारी,
कधी पोहोचतो कधी पोहचतही नाही घरी.

पाहता पाहता वर्षे लोटली यात,
बसलोय तुलाच विनवणी गीत गात,
कधी शब्द तर कधी भावना येते उफाळून,
आता सार्‍यांनाच माझ प्रेम चुकलय कळून.

पण तुला हे कधी कळणार,
आणखी एकदा कधी तुझे पाय वळणार,
आतुरतेने तुझी बघतोय वाट,
सांगशील तो पार करेन घाट.