वाचव

तुला शोधूशोधून थकलो,
पण तुझ्याशिवाय जगायला नाही शिकलो,
आजही रडत तडफडत जगतोय,
जवळ नसलीस तरी तुझ्याकडेच आधार मागतोय.

घर-दार उरलाय नावाला,
घोर लागलाय त्यांच्या जीवाला,
पण माझा जीव त्यांना नाही कळत,
तुम्हा दोघांवरील जीवात मी असतो जळत.

हे सारे नव्याने नाही सांगणे,
आजपर्यंत हेच करत आलोय मागणे,
त्यासाठीच चालू हे सततचे झुरणे,
आता तुझ्यावर आहे माझे काय करणे.

जसा होतो काल तसाच आहे आज,
प्रेमावर उद्याही राहील हा नाज,
तुझ्याशिवाय जगणे भले होईल बेचव,
जमल्यास तूच त्याला वाचव.