हवे ते बोल

ओळख तुझ्या शब्दांचा मोल,
समोर येऊन एकदा हवे ते बोल,
होकार नाही तर दे नकार,
जे बोलशील ते करेन स्वीकार.

साल दरसाल चालले तेच,
आणखीच कठीण झालाय तो पेच,
एकदा त्यांचा लव निकाल,
मग चालेल भले रात्र व होवो सकाळ.

वर्षानु वर्षे तुला आहे शोधत,
आता तूच कर त्यात मदत,
कारण मी आहे कुचकामी ठरलो,
तुझे निर्णय ऐकण्या केवळ उरलो.

संक्षिप्त बोललेले चालेल,
भावार्थ नेमका कळेल,
शिवाय तेच मान्य करणार,
नसशील येणार तर कायम दूर जाणार.