आयुष्याचा रकाना

स्वप्ने स्वप्नेच राहिली ,
जी तुझ्यासोबत होती पाहीली ,
पण ज्यांची कल्पनाही केली नव्हती ,
त्यांनी साकारल्याची दिली पावती .

चुकीचे ते पहिले काय ?
एकटेपणावर हवा असतोच उपाय ,
त्यासाठी भावली तुझी संगत ,
कारण तू हि माझ्यात होतीस रंगत .

सारे चांगले दिसले ,
मन गुंतून बसले ,
आता दिसत नव्हते आणखी काही ,
आयुष्याच्या करारावर झालेली सही .

पण नियतीस मानवला ना करार ,
तिने पाडलीच आपल्यात दरार ,
ना तुझा ना स्वप्नांचा राहिला ठिकाणा ,
रिकामाच राहिला आयुष्याचा रकाना .