कर

का केलस मनात घर,
भरतही नाहीस घराचे कर,
कर अतिशय आहे सामान्य,
ते तर करावेच लागेल मान्य.

पूर्ण मन आहे तुझ्याच नावे,
कोणाचेच नसतील त्यावर दावे,
उपभोगात तुझाच आहे मालकी हक्क,
जवळ नसलीस म्हणून होऊ नको थक्क.

आदेश नाही करतोय विनंती अर्ज,
गरजेपोटी घे बिनव्याजी कर्ज,
पण नको हा कर चुकऊ,
आधीच थकलोय आणखी नको थकऊ.

कर आहे एक शेवटची भेट,
ती हि तू सांगशील तिथे थेट,
तेच ठरेल भावी उपजीविकेचे साधन,
कारण कधीच सोडायचं नाही हे बंधन.