काय जमेल

ना विसरणे, ना जमले तुला शोधणे,
ना जमले देवाशी संधान साधणे,
तुझ्याशिवाय कुणाशीच नव्हती संगत,
तूच सांग कुठवर असेल माझी रंगत.

मैदानी उतरलो घेऊन प्राण,
पणाला लावले तण-मन-धन अन ध्यान,
आणखी ही तयार होतीच साधने,
शिवाय तोडलेली नात्यांची बंधने.

वर्षानुवर्षे दिले दैवाशी लढे,
घेतच राहिलो अपयशाचे धडे,
विश्वास होता कधीतरी होईल जीत,
थोडे तरी असेलच आपले ही हित.

नख-शिकांत आहे तुला जाण,
तूच दे मला विजयाचे भान,
सांग यातले मला काय जमेल,
त्या तरी कामी मन रमेल.