खुशाली कळावी

नको बघू माझ्यासारखे जागून,
पण एकदाच जा मला बघून,
वचन घे थांबण्याचा नसेल आग्रह,
सांगशील त्या दिशेने फिरवेन माझे ग्रह.

सोडून गेलीस कल्पना ना देता,
माझ्या मनी कायम राहिला गुंता,
एवढे माझ्याकडून काय चुकीचे घडले ?
कायमचेच नाते नाहीस ना तू तोडले ?

कळली ना तुला जी शोधमोहीम आखली,
नंतरची एक ही हाक तू नाहीस ऐकली,
तुझी, किमान सादेची वाटच राहिलो बघत,
एक आस मनी ठेऊन राहिलो जगत.

आज मन खुंटले हात पाय ठकले,
पण तुझे प्रेम कायम राखले,
आता एकच इच्छा तुझी खुशाली कळावी,
त्यासाठी ये, नाही म्हणत साथ मिळावी.