तयार

तयार सोडायला गाव,
माझ्यासोबत जोडायचंय तुझं नाव,
नव्याने बरसतील जुनेच ढग,
निर्माण करतील नवीन जग.

तयार तोडायला जुनी नाती,
तयार ठेचायला छाती,
जोडायचंय तुझ्याशी नाते नवे,
तयार सोडायला जिव्हाळ्याचे थवे.

तयार हाल सोसायला,
तरी खोट हसायला,
हसताना बघायचंय तुला,
माझ्या हास्याला होऊ दे ढील्ला.

तयार बनायला तुझा गुलाम,
तयार मारायला तुला सलाम,
तू माझ्यावर स्वतःला होतेस ओतले,
म्हणूनच तर हे मन तुझ्यात आहे गुंतले.

तयार मारायला मरायला,
तुझ्यासाठी वाम मार्ग धरायला,
हे सारे मिळाले राहून चांगले,
काय बिघडेल भले वाम मार्ग डागले.

तयार आणखी हि करायला बरच,
प्रेम आहे तुझ्यावर खरच,
तेच मला हवय परत,
त्यासाठीच आहे खटाटोप करत.