तू आणि देव

तू आणि देव दोघांना आलो शरण,
पण कुणालाच दिसले ना माझे मरण,
दोघे हि राहिलात तेवढेच दूर,
का म्हणू नको तुम्हा क्रूर.

इतर कुणाच्या पडलो ना पाया,
तुमच्याच चरणी होती दया,
पण इतरांनी तर होते आधीच दूर सारले,
आपले सोबत जगण्या – मरण्याचे होते ठरले.

का पाहता माझा अंत ?
थोडी हि होत नाही का खंत ?
सांगा माझ्याकडून काय चुकले ?
कोणते उपाय माझ्याकडून ठकले ?

ना आधार ना कोणी गुरु,
तुम्हीच सांगा मी काय करू,
सारखा विचार एकच ध्यानी मनी,
कधी फुटेल तुमच्या काळजाला पाणी.