नवे नाते

दाखव जर असेल नवे नाते जुडले,
लगेच असेल मी आपले नाते तोडले,
पण असाच कसा विश्वास ठेऊ,
न पहाता तुला कसा अंतर देऊ.

शोध घेतला तुझा बराच काळ,
प्रतीक्षा हि केली बनून मवाळ,
पण फायद्याचे काहीच ना ठरले,
हात शेवटी रिकामेच उरले.

तुझी मुलीची आहे जात,
घरच्यांनी वेळीच पिवळे केले असतील हात,
आज याची थोडीशी होते जाणीव,
पण मनाला विश्वासाची आहे उणीव.

म्हणून एकदाच दाखव तुझी सुखी जोडी,
संपवून टाकेन तुझी मनातील गोडी,
नात्याचा राखता येतो मला मान,
एकदा पाहायचे आहे तुझे चाललेले छान.