पाठींबा

एकदा तरी थोपट पाठ,
खूप पाहिले तुझी वाट,
नको देऊ त्यागाला किंमत,
पाठ थोपटून एकदा वाढव हिम्मत.

दैवाने तर कमी नव्हते ठेवले,
चिरडण्याला आपणास उचललेली पाऊले,
त्या प्रयत्नात आज ही ना पडला खंड,
मनस्ताप दिलाय त्याने प्रचंड.

पण सहन केला सारा त्रास,
दाखवले आपण आहोत खास,
घेतले ना कधी नमते,
देतोय उत्तर जसे जमते.

पण तुझी ना मिळाली साथ यात,
तरी ना होऊ दिली आपली मात,
तुझ्या छोटया पाठिंब्याची अपेक्षा करतो,
कारण एकटया प्रयत्नांनी आहे अपयशी ठरतो.