भुताटकी

भलतीच वाटते मला भीती,
फिरू शकते कुणाची नीती ?
शुद्धीवर आहे ना तुझी मती ?
कोणी केली तर नाही भानामती ?

नाही ना पाहिलास कोणी मृत,
नाही ना तुला लागला भूत,
अशी का तू वेगळीच आहेस वागत,
जराही मला वळून नाही बघत.

एवढा मी तुला मारतोय हाक,
असा कसा निसटला माझा धाक,
काहीतरी रहस्य आहे लपून,
असे कसे प्रेम जाईल संपून.

आज काल तूटले सार्‍यांशी संगत,
कुठे शोधू मी जालीम भगत,
आता एकच करणे आहे हाती,
मी जळवल्यात तू जुळव देवासमोर वाती.