मार्ग

मार्ग झालेत धुसर,
तरी सोडत नाही कसर,
चाचपले मिळालेले मार्ग,
कधी आणला ना विसर्ग.

बर्‍याच गोष्टी आल्या अडव्या,
पण माझ्याही झुंजी होत्या कडव्या,
म्हणूनच लढून पुरून उरलो,
भले अद्याप विजयी नाही ठरलो.

हा विजय तुझ्याच आहे हाती,
हवी तेव्हा देऊ शकतेस गती,
तुझ्या शिवाय मी पूर्ण नाही,
मन तुझ्याच मदतीची वाट पाही.

सांगत नाही जास्त करायला,
क्षणभरासाठी अज्ञातवास हरायला,
पुढचं सांरं माझ्यावर ठेव,
आता दुराऊ नाही शकणार आपल्याला देव.