संधी

तुला शोधून झालो मी हैरान,
तरी सोडली नाही हि दुनिया विराण,
याच दुनियेत राहिलोय पाय रोऊन,
इथेच तुला यायचय पुन्हा घेऊन.

पण त्यावेळी नसेल हि दुनिया विराण,
पाना फुलांनी बहरेल आपले रान,
हि सारी तुझीच असेल जादू,
विसरलेलो मी पुन्हा हसेन खुदू-खुदू.

एकदा दे मला संधी,
आयुष्याची करेन चांदी,
आणखी मागणार नाही मी काही,
तुझ्याच नावावर उरलेली जन्मे सहाही.