संयम

विचार करून डोके व्हायचे बधिर,
प्रसंग आहेच तेव्हढा गंभीर,
पण कधी मी धीर नाही सोडले,
भलत्याच संयमाशी नाते आहे जडले.

तुझ्यावर आज हि तितकाच आहे मरत,
म्हणून तू हवीस मला परत,
त्यासाठीच चालू हे इतके झुरणे,
मान्य त्यासाठी वाट्टेल ते करणे.

पण हि आजची नाही गोष्ट,
कित्तेक वर्षे सोसतोय कष्ट,
ना वेदना ना कंटाळा,
कळे ना यात हि कसला घोटाळा.

पण खंत वाटतेच थोडी,
कधी येईल आपल्या नशिबी गोडी,
तू आणि दैव दोघांकडून होते ताना ताण,
पण कधी तरी येईलच तुम्हास याची जाण.