सांग काय करू

तूच सांग मी काय करू,
कळत नाही जगू कि मरू,
अवघड झालय तुझ्याशिवाय,
म्हणून तुझाच सल्ला हवाय.

तुझ्यासाठी केले नाही काय ?
दुरावले घर दुखावले पाय,
शोधून तुला आज गेलोय दमून,
नव्हते जमत तेही आले जमून.

पण सारे प्रयत्न गेले वाया,
इतरांना नको तुलाही आली नाही दया,
चालूच आज तडफड मनाची,
एकटाच सोसतोय झळ उन्हाची.

तुझा हि माझ्यावर आहे ना जीव,
पुजायचिस माझ्यासाठी पार्वती शिव,
आजही असाच काहीसा मार्ग दाखव,
पुन्हा मला तुझ्या रंगाने माखव.