स्वतःचे हित

तुला वाटले असेल संपले सारे,
थांबले असतील माझे प्रीतीचे वारे,
सुरु केले असेल आयुष्य नवे,
मिळाले असेल जे होते हवे.

म्हणूनच पाहिले नाहीस मागे फिरकून,
पण गेली नाहीस इथले सारे उरकून,
जाताना घेतलाही नाहीस निरोप,
अर्धवट केलास सार्‍याचा समारोप.

पण कधीतरी समजून घ्यायचीस माझी कथा,
आजही साजरी करतोय माझी व्यथा,
कुणालाच कळली नाही माझी प्रीत,
जो तो मश्गुल जपण्यात स्वतःचे हित.

आज ही सारे मी ठेवले जपून,
भले तू अंतर गेलीस बरेच कापून,
आज ही आहे जेथे जे होते,
एकटाच सांभाळतोय प्रीतीचे नाते.