हट्ट

तू केलेस जे तुला वाटले,
मी तेच केले जे मला पटले,
एवढ्या वर्षानंतर ही चालू तेच,
कशी बरी होईल ह्रिदयाची ठेच ?

दैव आणि हट्ट यांतील खेचा खेच,
वाढतच चाललाय विरहाचा पेच,
ना हार ना कुणाची झाली जीत,
नुकसान केवळ सोसते आपली प्रीत.

वाटले असेल माझ्यात ताकद ना पुरेशी,
दुःख कवटाळून बसलीस उराशी,
असहाय झाल्यावर दिलेस सारे फेकून,
थोडे तरी म्हणणे घ्यायचे ऐकून.

पण दुरावल्यावरही खूप शोधले तुझे गाव,
नाही माहीत कळले की नाही माझे भाव,
या पुढे ही मनाला वाटेल तसेच वाग,
मन मात्र काढताच राहील तुझा माग.