हो की नाही

कुठे तुझे चित्त हरवले ,
कसे तुला हे करवले ,
दुरावलीस इथवर होते ठीक ,
पण आज हाकाना ही घालत नाहीस भीक .

नेहमी असायचे सांगणे ,
माझ्याशिवाय शक्य ना जगणे ,
त्यासंबंधी वचन दिले शपथ घेतली ,
एवढी मने खोलवर होती रुतली .

पण दैव आले आडवे ,
दुरावलो आपण प्रेमी कडवे ,
अंतर ही दिवसेंदिवस गेले वाढत ,
थांबवू ना शकलो जे आहे घडत .

पण नुसतीच ना मी भिजवली नेत्रे ,
शोधत हाका मारल्या, लिहिली पत्रे ,
अद्याप नाही मिळाले तुझे उत्तर काही ,
एकदा तरी कळव हो की नाही .