खूप वाटते

खूप वाटते आपणही प्रेम करावे,
आपल्यावरही कोणीतरी मरावे,
खूप ऐकली याची महीमा,
पहायची आहे याची गरीमा.

सारे म्हणतात प्रेम नसते दिसते तसे,
पण नाही अनुभव हे असते कसे,
तारुण्य माझे आहे जसा कागद कोरा,
बघायच आहे हा दिसतो काळा कि गोरा.

काही म्हणतात प्रेम म्हणजे चार पोरी फिरवणे,
काही म्हणतात एकच अक्षर आयूष्यभर गिरवणे,
दुसर वाक्य मला वाटतय समर्पक,
पण पहिल्याचे कमी नाहीत समर्थक.

म्हणून वाटते आयुष्यात कोणीतरी यावी,
आणि माझी सर्व सुत्रे हाती घ्यावी,
वाट बघतोय प्रेमाचा अनुभव कधी घेईन,
आणि प्रेम “असे असते” गर्वाने सांगाया जाईन.