पाय घसरला

कळत नकळत पाय घसरला,
पण मन त्याला कधीही नाही विसरला,
विसरेलचं कसे जिवावर जे बेतले,
अनावधानाने प्रेमाचे रोग जे घेतले.

तशी त्याचीही नव्हती चूक,
त्यानेही किती रहायचे मूक,
‘तीला’ पहाताच त्याला शब्द फुटले,
त्याचे पाय सैरावैरा धावत सुटले.

तशी बुद्धी म्हणाली आत्ताच सावर,
हा खेळ आता इथेच आवर,
पण मनावर चढलेली वेगळीच धुंद,
नव्हतं माहीत प्रेमाचा रस्ता असतो अरुंद.

याने ऐकल्या होत्या प्रेमाच्या गोष्टी,
काही नायक सुखी तर होते काही कष्टी,
काहींनी समजावल हा आहे रस्ता बिकट,
पण नाही दिसला झालेलाही तो चिकट.

अशातच एकदा घसरला पाय,
मग होणार होते काय,
मन जखमी झाले जबर,
अन स्वत:साठी खोदली कबर.

पण कबर होती खूपच लहान,
एवढेही व्हायचे नव्हते महान,
की, जग म्हणेल ‘आई-बाबांनाही त्यात सामावले,
आणि पोराने प्रेमाच्या इतिहासात नाव कमावले’.