आमच्याविषयी

देवाने दिलेली साहित्य निर्मितीची अभूतपूर्व कला रसिक वाचकांसमोर आणून त्यांचे निखळ मनोरंजन करणे हाच आमचा मुख्य हेतू आहे. हा हेतू साधण्यासाठी सोपा, विस्तृत, आधुनिक आणि स्वस्त साधन म्हणजे संकेतस्थळ जाणवले, म्हणूनच आम्ही “मराठीसेवाडॉटकॉम” / www.marathiseva.com ची निर्मिती केली.

एक सामान्य माणूस जीवन जगत असताना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यातील बरेच आपण मौखिक अथवा लेखिक स्वरुपात आपल्या जवळच्यांसोबत व्यक्त करत असतो. काही कल्पना करतो, योजना आखतो त्यांना ही अशीच वाट मोकळी करून देतो. इथे हि तेच केलेले आहे. जात, धर्म, प्रदेश इत्यादी कोणतीच बंधने न पाळता प्रत्येक मराठी माणसाला आपला जवळचा मानून कवी मनाने इथे आपले मन मोकळे केले आहे.

साहित्य निर्मिती होत असताना ती वाचकांसमोर आणण्याचा जेंव्हा विचार आला, तेव्हा त्यासाठी मार्ग कोणता हा प्रश्न होता. जर ‘पुस्तक’ हा मार्ग निवडला तर त्यासाठी प्रकाशक, त्याची सम्मती आणि त्याचे प्रकाशनाचे विस्तृत जाळे इत्यादी बरेच काही असणे गरजेचे होते. शिवाय सर्व साहित्य एकाच पुस्तकात सामावणे शक्य नव्हते. आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे आजचे आपले जीवन हे धकाधकीचे झाले आहे. पुस्तक वाचायला बर्‍याच मंडळीना वेळ नसतो.

म्हणूनच सोपा, विस्तृत, आधुनिक आणि स्वस्त मार्ग म्हणजे संकेतस्थळ जाणवले. जिथे हवे तेवढे साहित्य वाचकांना सहज उपलब्ध करून देता येईल, ज्याची व्याप्ती हि जागतिक आहे, खर्च हि कमी लागेल, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाचकांना वाचनासाठी स्वतंत्र वेळ काढण्याची गरज नाही. बसल्या बसल्या मोबाईल वर अथवा कार्यालयामध्ये कामाचा क्षीण घालवण्यासाठी संगणकावर हे सहज वाचता येईल.

शेवटी एवढेच सांगायचे आहे कि संकेतस्थळावर साहित्य वाचन हा मार्ग तसा नवीनच आहे. पण ती काळाची गरज ही आहे. म्हणून अवश्य पहात रहा “मराठीसेवाडॉटकॉम” / www.marathiseva.com