लायकी

काय झाले कोणास ठाऊक,
पण हे मन झाले भाऊक,
वाटले कशाला झाली तिची भेट,
कुठे आहे मी मोठा सेठ.

उगीचच लावला जीव,
आता स्वतःचीच वाटते कीव,
जर तिच्याशी पडली नसती गाठ,
उभी राहिली असती मान ताठ.

आता तरी नीट रहा,
डोळे उघडे ठेऊन पहा,
हीच आहे तुझी लायकी,
कशास करतोस नायकी.