वेबसाईटच्या यशानंतर आपल्या भेटीस आणत आहोत नवीन काव्यसंग्रह पुस्तक स्वरूपात – “शेवटची भेट”. शाश्वत प्रकाशनंद्वारे प्रकाशित केलेला कवितासंग्रह शेवटची भेट हा एक संवाद आहे. मात्र हा एकतर्फी संवाद असून प्रियकराचा आपल्या हरवलेल्या प्रेयसीला परत बोलावण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. प्रेयसी अवचित हरवल्यानंतर प्रियकराने तिला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र काही केल्या ती सापडली नाही.
पण प्रियकराला नियतीसमोर हरायचं नाही. म्हणून सदर कविता संग्रहातील प्रत्येक कवितेत तो आपल्या प्रेयसीला विनंती करतो की एकदा शेवटची भेट. कशीही, परतून किंवा हवे तिकडे बोलावून. शेवटच्या भेटीनंतर इथेच राहायचं की पुन्हा जायचं हा ही निर्णय प्रेयसीने स्वतः घ्यायचा आहे. तिच्यावर कुठलेही बंधन नसेल. म्हणून एकदा शेवटची भेट.

पुस्तक प्रमुख ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध.
https://shashwatpublication.com/shevatchi-bhet-book
https://www.flipkart.com/shevatchi-bhet-ekda-kshanbhar/p/itm4472c4db6eadb
https://books.google.co.in/books/about/Shevatchi_Bhet.html?id=_2loEQAAQBAJ&redir_esc=y
आपल्या जवळचे वाचनालय / लायब्ररी यांना हे पुस्तक घेण्यास नक्की सुचवा.