अमर नाही व्हायचे

असे वाटते मला काहीतरी झालय,
जीवनात काटकोणी वळण आलय,
मनाला होणारी वेदना ही आज वाटते गोड,
सारखी लागते तिला भेटण्याची ओढ.

तिची नि माझी ओळख जुनी खरी,
पण आज ती वाटायला लागले परी,
वाटते आयुष्याचा गाडा आता स्वतः चालवावा,
उरलेला आयुष्य तिच्या बरोबर घालवावा.

पण भीती वाटते एक मनी,
तिच्या ही असेन का मी ध्यानी ?
कारण ती आहे सगळ्यांसाठीच परी,
तिच्या दृष्टीत माझी लायकी असेल ना बरी ?

याच विचारात रात्री नाही येत झोप,
भीती वाटते दैवाचा नसेल ना यावर कोप,
कारण यशस्वी प्रेमाची उदाहरणे असतात काही,
प्रेम इतिहासात अमरतेची इच्छा माझी तरी नाही.