अस व्हावं

सुरू झाल्यात प्रेमाच्या सरी,
मन रमेना आता घरी,
सारखे वाटते काँलेजला जावे,
पाठी बसून तिला न्याहाळत रहावे.

कोणी पाहील्यास डोक्यावर हात द्यावे,
डोळ्यांनी थोडा विसावा घ्यावे,
पण लगेच कार्यक्षम व्हावी नजर तिरकी,
मध्येच कानोसा घ्यायला तीने मारावी गिरकी.

सुट्टीत तिच्यासह काँटीन गाठावी,
तिलाही थोडी मजा वाटावी,
पण तिच्या मैत्रिणींनी जावे दूर,
नाही माझ्याकडे पैशाचा पूर.

अभ्यासाच्या नावाखाली लायब्ररीत न्यावी,
सवड नसताना पुस्तके घ्यावी,
थोपवून ठेवण्यासाठी विचारावे प्रश्न,
आणि तेव्हढ्यातच मानावे जश्न.

काँलेज संपल्यावर सोबतच निघावे,
तिच्या घराच्या दिशेने येन्याचे बघावे,
या सर्व घटनांनी मैत्रीणींना संशय यावा,
आणि त्याच्यात तिच्याविरुद्ध ठोकवा दावा.

घरी आल्यावर चटकन रात्र व्हावी,
झोपी गेल्यावर स्वप्नातही तीच यावी,
लवकरच रात्रीची वेळ सरावी,
अन् पून्हा एकदा काँलेजची तयारी करावी.