एक कळी

एक उमळली कळी,
जिला पडलो मी बळी,
कळीची भेट तशी सात वर्षाची,
जी तात्काळ वाटली होती हर्षाची.

वियोगानंतर भेटली वर्गात,
पाहताच मी पोहोचलो स्वर्गात,
अनेकदा टाकली तीनेच नजर,
म्हणूनच करत आहे तिचा गजर.

मला वाटले होती नजर माझ्यावर,
पण सखे सांगतात असेल दुजावर,
काय करावे काहीच कळेना,
थोडे कळत असूनही वळेना.

आता एकच ठेवतो आशा,
मग काहीही होवो माझी दशा,
तिच्या समोर प्रश्न टाकतो,
अनपेक्षित उत्तरात स्वतःला दूर फेकतो.