कधी असेही झाले

तिला पाहताच तिच्या पाठी लागलो,
तिच्यासाठी नको तसे वागलो,
कधी हे केले तर कधी ते केले,
हिशोब लावतोय यात काय काय गेले.

कधी तिच्यासाठी अभ्यास सोडला,
ऑफिसर बनण्याचा स्वप्न मोडला,
तिच्याच विचारात झालो दंग,
आणि ऑफिसरच्या स्वप्नातून चोरले अंग.

कधी प्राध्यापक नाही आठवले,
त्यांचे विचार त्यांच्याकडे परत पाठवले,
त्यांच्या सल्ल्याकडे कधी ही नाही दिले लक्षं,
आजची ही स्थिती देते त्याचीच साक्ष.

अभेद्य असतो मायेचा किल्ला,
पडला नाही पण परका वाटला त्यांचाही सल्ला,
तिच्यासाठी आई पासून दुरावलो पार,
आणि त्या मायेच्या काळजावर केला मोठा वार.

कधी प्रेमासाठी परकी वाटली बहीण लहान,
एवढा होत गेलो मी महान,
बहिणीने प्रयत्न केले प्रश्न सोडवण्याचे,
पण माझे प्रयत्न राहिले तिला रडवण्याचे.

कधी बाबांचा धाक वाटला क्रूर,
धाक, तिची आठवण यांनी भरून येतं ऊर,
त्यामुळे सुटला त्यांच्या मायेचा ताबा,
आज खंत वाटते दुरावले बाबा.