का ?

का अशी रोज रोज आठवतेस ?
का अशी आठऊन मन गोठवतेस ?
यामुळे मी तुझ्याच विचारात मुक होतो,
आणि सार्‍यांशीच नकळत कट्टी घेतो.

तू आठवताच तुझ्यातच गुंग होतो,
समजत नाही कधी अभ्यासाचा खोळंबा होतो,
उत्तम करियर घडवण्याची नाहीच अता आस,
किमान झालो तरी पाहिजे पास.

माझ्यासाठी आई दिवस रात्र झटते,
पण तू आठवताच तिची मायाही परकी वाटते,
मला बघून बाबा बहीण हसण्याचं टाळतात,
आजारी समजून बरे होण्यास व्रत पाळतात.

असं करून तुला मिळते का सुख,
माफ कर समजले प्रित जोडण्याची चूक,
आता पुन्हा नाही अशी चूक करणार,
चुकूनही नाही कोणावर एवढा मरणार.