तिच्या प्रेमात

दैवाने आपले केले नाही तिच्यासाठी चयन,
त्यामुळे थोडे पाणावले नयन,
बुदधी म्हणाली प्रेमात केलेस तू एवढ सहन,
काय कामावले-गमावले यावर व्हावी चर्चा गहन.

माहीत नव्हत्या प्रेमातील अटी,
प्रेम करतात सिनेमातील नट-नटी,
आपण त्यातलीच एक मानून लागलो तीच्या पाठी,
प्रेमाला सर्वस्वी मानून हानली करियरवर काठी.

आई पासून लपू नाही शकली माझी काया,
काही न संगीतल्याने ती ही पडली देवच्या पाया,
पण दिसली नाही माला तिची वेडी माया,
होतो तसाच राहून भक्ती घालवली तिची वाया.

सुखद वाटला प्रेमाचा सर्व स्पर्श गार,
पण तो टिकला केवळ दिवस चार,
त्यानंतर बसली माला मार,
पण तत्पूर्वी अभ्यासला केलेला हृदयपार.

शेवटी बूदधी विचारते आता शिल्लक आहे काही,
मन नाही, ध्यान नाही, ध्येयही नाही,
हृदय अशक्य चमत्कारांची वाट पाही,
त्यासाठी शरीर रात्रीही जागा राही.