नवीनच

कॉलेज सुटल्यावर पाठलाग करत येणे,
तू पाठी पाहील्यास थोडा विसावा घेणे,
मग तू गेलीस काय हे बघणे,
आणि पुन्हा पाठलागीला लागणे.

नवीनच होतं सगळं,
आणि म्हणूनच होतं वेगळ….

आपल्याला एकच वर्ग मिळणे,
तुला बिन्दु मानून आयुष्य काटकोनात वळणे,
तुझ्याशी बोलायला उत्सुक असणे,
आणि त्यासाठी कंबर कसणे.

तू माझं मन चोरणे,
तुझी मूर्त हृदयावर कोरणे,
तिला कुरवाळत रात्र रात्र जागणे,
आणि यात मतीमंदसारखे वागणे.

तुझ्या आठवणीत खाणे पिणे सोडणे,
ऊन वारा पाऊस सगळ्यांनीच माला झोडणे,
एवढे सगळे आनंदात सहन करणे,
तरीही तुझ्यासाठीच्या प्रतिस्पर्धीना पुरून उरणे.

कधीतरी अचानक लायकी आठवणे,
माझ्यातील विचारवंताला ऊठवणे,
प्रथम स्वावलंबी बनण्याचा फैसला करणे,
पण लगेचच मुश्किल वाटणे तरणे.

त्यासाठी मग विरह सोसणे,
थोडे दैवाला कोसणे,
तरीही तुला विसरण्याची तयारी करणे,
मात्र मनात शेवटी तूच उरणे.

नवीनच होतं सगळं,
आणि म्हणूनच होतं वेगळ….