पत्र

प्रिये हे तुझ्यासाठी पत्र,
कधी संपणार हा आठवणीचा सत्र,
विरहात गेले कित्तेक दिवस,
देवलाही खूप केले नवस.

खर आहे तुझ्यावर प्रेम केले,
त्याचबरोबर सारे चैनही गेले,
आता बोलणारा तोंड राहतो मौन,
आणि सारे जग वाटते गौण.

दुःखाची गोष्ट केवळ एक,
नाही मी पैसेवाल्याचा लेक,
ही गोष्ट चांगलीच पटली,
म्हणूनच गं विचारायला लाज वाटली.

म्हणूनच वाटले तुला विसरण्याचे पहावे,
त्यासाठी प्रथम कॉलेज बदलून घ्यावे,
इतरही उपाय करून झाले,
पण नाही थांबले तुझ्या आठवणीचे चाळे.

सांग कधी बरा होणार हा प्रेमाचा रोग,
की, आयुष्यभरासाठी आहे हा भोग,
कारण मी नाही बनवू शकत सोन्याचा स्वर्ग,
आता तूच दाखव नवा मार्ग.