पहिली वेळ

कूस बदलत घालवली सारी रात्र,
थोडेसे थकून गेले हे नेत्र,
मन सारी रात्र राहिला जळत,
पण काय झाले माला नाही कळत.

अशा प्रकारची ही पहिलीच वेळ,
वाटत नाही हा साधारण खेळ,
चैन हरवले गेले मन आणि ध्यान,
विसरलो आजवर कामावलेले ज्ञान.

चिंतित झालेत आई बाबा,
गळून पडलाय त्यांच्या मायेचा ताबा,
बहीण काळजीत आणि हैराण मित्र,
स्पष्ट होईना माझ्या बाबतचे चित्र.

ध्यानी असतो सारखा तिचाच विचार,
त्याला घालवण्यात ठरतो मी लाचार,
उदास ओठी गुण गुणतात प्रेमाचे गीत,
भीती वाटते ही नसेल ना प्रित ?