प्रत्यक्षात

प्रत्यक्षात नाही तर नाही,
किमान स्वप्नात तरी भेट,
हाती फूल नाही तर नाही,
किमान डोळ्यात भाव तरी दाखव.

प्रेम आहे सांगू शकलो नाही,
किमान आहे ते तर दाखवले,
दाखवताना शब्द तेवढे शोधले,
पण लिहू नाही शकलो.

असे का ग घडले असावे ?
लायकी एकमेव कारण काय ?
असे असल्यास नको मानव जन्म,
देवाला म्हणतो पुढचा जन्म दे पशुचा.