प्रयत्न

तू माझीच आहेस अर्चना,(भक्ति)
अशी करू शकत नाही गर्जना,
कारण भीती नाही वाटते लाज,
कोणत्या गोष्टीवर आहे मला नाज ?

पाहताच तुला निरशेला मुकलो,
तुझ्या एका नजरेने स्पर्धेत टिकलो,
सांगत सुटलो तूच आहेस माझी गझल,
पण एवढीच पोहोचली माझी मजल.

ठाऊक नसेल तुला नव्हतो मी लायक,
तरी बनवलेस मला नायक,
पण शेवटी पडला यात भंग,
मी वेगळ्या मार्गी जाऊन दाखवला रंग.

मार्ग झाले वेगळे,
तसे नवीन भेटले सगळे,
वाटले तज्ञ होईन अन्य मुलींना पटवण्यात,
पण दिवस गेले तुलाच आठवण्यात.

आज भले ही तू माझी नसशील,
पण स्वप्न बघतोय उद्या माझी असशील,
प्रयत्न करतोय कुंकू लाविण तुझ्या माथी,
नशीब बदलणे नाही पण घडवणे असते हाती.