प्रितीचे सूर

तुझ्या सोबत होते जगायचे,
पण दूखावशील असे नव्हते वागायचे,
म्हणूनच मनाने एवढा दू:खवलो,
तरीही शरीराने तुझ्यापासून दूरवलो.

प्रेमात पडण्याची होती खूप इच्छा,
पण मनाने तेवढाच होतो सच्चा,
कोणत्याही गोष्टीत नव्हतो मी लायक,
कसा बानू शकलो असतो तूझा नायक.

मनाला खूप वाईट वाटले,
पण बुद्धीने संगीतलेले पटले,
आज माझ्याकडे भले असेलही काही,
पण ते तुझ्यासाठी पूरेसे नाही.

शेवटी तुला न व्हायला अपाय,
समोर ठेवला एकच उपाय,
मनाने नाही, शरीराने आलो खूप दूर,
मन रडते कानी पडताच प्रितीचे सुर.