प्रेमगीत

प्रेमाच्या व्याख्या पूरे झाल्या,
होत्या त्या गर्दीत विरून गेल्या,
अवघड आहेत शब्दात मांडणे,
पण मला वाटते प्रेम म्हणजे नसते भांडणे.

भांडण समाजाशी कधीच नसावे,
त्यांच्यातील गैरसमजांविरुद्ध असावे,
समाजाला पटवावे खरा प्रेम लफडा नसतो,
तो तर काटेरी आयूष्याचा रेशमी आधार असतो.

एकतर्फी प्रेम असू शकतो,
म्हणून मार्ग अवलंबू नये नको तो,
शेवटी प्रत्येकाच्या असतात वेगळ्या आशा,
आशावेळी कोणाची तरी व्हायचीच निराशा.

घरच्यांच्या मनात आधीच फुलवावी विश्वासाची बाग,
त्यामुळे नष्ट नाही पण कमी होईल त्यांचा राग,
शेवटी प्रेमाने जिंकता येते जग,
तेढ कशाला निर्माण करायची मग.

पण नशिबाशी नक्कीच करावी लढाई,
प्रेमाची साथ घेऊन करावी चढाई,
यश येताच लगेच मुहूर्त पहावा,
पण वेळेत न आल्यास विरह सहावा.

शेवटी बलिदान हे प्रेमाचे आहे नाव,
विश्वासात व्यक्त होतो त्याचा भाव,
निष्ठा हे आहे त्याचं वजन,
आन् ही कविता त्याचं भजन.