प्रेमातील अवस्था

जेवताना नाही लक्ष लागत,
ताटातील काही संपले तरी नाही मागत,
कारण ताटातील माझ्या संपलय काही,
हे लक्षातच येत नाही.

आई बिचारी उगीचच काळजी करते,
माझ्यावर जादू टोना तर नाही झाला घाबरते,
उठल्या बसल्या दृष्ट काढते,
सारखे जेवायला वाढते.

छोटी बहीण अभ्यासाला येते,
क्षणभर लक्ष वेधून घेते,
पूस्तक घेऊन हाती पालटतो पानावर पान,
कळत नाही कधी गमावून बसतो भान.

मला पाहून ती ही काळजीत जाते,
म्हणते अत्ता बाबांची खबर घेते,
माझ्या भाऊला बोलतात का ?
घाबरू नकोस हे चॉकलेट खा.

बाबा माझे तसे साधे भोळे,
त्यांनाही दिसले माझे खचलेले डोळे,
मूलगा जाणता झाल्याचे त्यांना वाटले,
हे वाटून त्यांचेही मन दाटले.

आई बहिणीने बाबांपर्यंत पोहोचवली खबर,
त्यांना आधीच बसलेला धक्का जबर,
म्हणाले बेटा अरे काळजी करतोस काय,
तूझ्या प्रश्नावर आहेत कित्तेक उपाय.

या तिघांचा झालाय गैरसमज,
त्यांना कशी देऊ समज,
की तुम्हाला वाटते तसे काही नाही,
तुमचा लाडका एक स्वप्न खरे करायला पाही.

“आई बाबांना मिळाले सुन,
बहिणीसारखेच आहेत तीचे गुण”,
तीनेच केलाय हा जादू टोना,
मनोमनी तीला विणवतोय तू माझी हो ना.