प्रेमातील एक दिवस

आज कॉलेजला कंटाळा आला,
दिवस पूर्ण विचारात गेला,
आज का बरे ती गैरहजर राहिली,
दिवसभरात नाही तिला पाहिली.

मुलांच्या दृष्टीत भलेही हुशार असलो,
तरी आज पहिलाच लेक्चर बसलो,
तिच्या विचारात व्याकुळ झाले मन,
म्हणून ठरविले “चल चलता बन”.

सारा कॅम्पस पायदळी तुडवला,
आजचा अभ्यास गंगेत बुडवला,
त्यामुळे मित्रांनी माला कोंडवले,
पण कसेतरी स्वतःला सोडवले.

मनात आले तिच्या घरी जावे,
काहीतरी बंडल मारून परत यावे,
पण गाडी भाड्यासाठी नव्हते पैसे,
उसनवार न पटल्याने परतलो थे जैसे.

काळजी वाटते दिवस कसा जाईल,
आणि नवीन आशेची सकाळ कधी येईल,
प्रेम यालाच म्हणतात असे वाटते,
बुद्धीलाही ते जरा जरा पटते.