बर्‍याच दिवसानी

बर्‍याच दिवसानी भेटली होती काल,
दोघांनी ही विचारले एक मेकांचे हाल,
दोघेही उत्तरलो सगळं आहे बरं,
पण मनाने विचारलं यात किती खरं ?

प्रेम म्हणजे काय नव्हतं माहीत,
कळत होतं कशात आहे हित – अहित,
पण तिला भेटताच समजला प्रेमचा अर्थ,
त्यामुळे आजचं जीवन वाटते व्यर्थ.

याला ती नाही माझ नशीब होतं कारण,
कारण तिच्यासाठी नव्हतं माझ्याकडे तारण,
म्हणून तिला विचारण्यापूर्वीच झालो दूर,
पण तिच्या आठवणींनी आज ही भरून येते ऊर.

धंदा नाही, नाही साधी नोकरी,
अंधारात आहे उद्याची भाकरी,
अपयश येतो जातो जिथे,
एक पद शंभर उमेदवार तिथे.

कानी पडले तिला बघायला आलेले,
ते ही चांगले यशस्वी झालेले,
त्यामुळे दुःख झाले तरी बोलते मन,
माझी नको चांगल्या राजाची राणी बन.