रडावेसे वाटते

असे वाटते खूप रडावे,
कारण नाही वाटत अशा प्रकारे सडावे,
जेवण नाही जात, लागत नाही झोप,
सार्‍या सुखाचाच झालाय लोप.

माहीत नव्हते प्रेमात असते आग,
खूप उशिरा आली मला जाग,
जाग येऊन ही फिरता येत नाही परत,
अशाच प्रकारे राहावे लागते झुरत.

तिला विसरण्याचा प्रयत्न केला खूप,
प्रत्तेक क्षणी डोळ्यासमोर उभारतो तिचे रूप,
आता तर विसरणे अशक्य वाटते,
त्यामुळे मन आधिकच दाटते.