वाटचाल

जीवन सुरळीत चाललेले,
आयुष्य प्रगतीकडे वळलेले,
मात्र थोडयाच प्रवासानंतर तिला पाहीली,
आणि तीच होती अधोगतीची घटना पहीली.

त्यानंतर जे झाले ते होते सारे निराळे,
मलाच काय पण घरच्यांनाही नाही ते जिराले,
मी नकळतपणे माझ मन तीच्यात रमवले,
आणि घरच्यांनीही त्यांच्या लाडक्याला गमावले.

त्यानंतर दिवस गेले वर्षेही गेली,
कित्येकांची यशाकडे वाटचाल झाली,
पण माझे पाय होते तिथेच राहिले,
विरहानंतरही स्वता:ला तिच्या प्रेमावर वाहिले.