स्टेशन वरील भेट

आज पुन्हा ती स्टेशनवर दिसली,
एसटीची वाट बघत होती बसली,
नेहमीप्रमाणे एकटी नव्हती,
थोरली बहीण सोबत होती.

रहावलं नाही गेलो जवळ,
काहीही झाले नाही नवल,
नेहमीप्रमाणे हृदयाची धडधड वाढली,
आणि बुद्धीला तिच्या पायाशी घुटमळत सोडली.

“कशी आहेस” मीच विचारले आधी,
भलेही ती दिसत होती साधी,
डोळ्यात विरह भाव दिसला जरी,
तरी म्हणाली “मी आहे बरी”.

मग बोलायचे असूनही मिळेना मुद्दा,
सारखीच अवस्था झाली तिचीसुद्धा,
मग म्हणाली बरेच दिवस घरी नाही आलास,
या प्रश्नाने घुटमळणारा मन अर्धा झाला खलास.

एवढच बोललो मिळत नाही वेळ,
मनात बोललो हा आहे नियतीचा खेळ,
माहीत होते कारण योग्य नाही,
तरीही बोलली नाही काही.

एवढ्यात एसटी आली,
या भेटीची वेळ झाली,
मग निघून गेली टाटा करत,
मन मात्र तिच्याच आठवणीत बसला झुरत.