स्वप्न

सुंदर स्वप्ने पाहिली,
देवाला फुले वाहिली,
देवा आता तरी मला पाव,
बाबांना तिच्या पटव माझे नाव.

तसा तो सावळा,
हाकेला माझ्या धावला,
त्याच्याच दरबारी पडली गाठ,
मी ही केली मान ताठ.

ते म्हणाले इकडे कसा,
घोर संकटात आहेस जसा,
काय हवे ते माग,
पण आधी व्यवस्थित जाग.

सोन्याची माझी पोर,
तिचाच आहे एक घोर,
म्हणूनच शोधतोय कुमार,
पण मला हवाय राजकुमार.

एवढेच ऐकू शकलो,
अन् उसने अवसान ओकलो,
“त्यांकडे मागतोस छोकरी,
पण कुठे आहे तुला नोकरी”.

डोळे झाले ओले,
मन स्वतःशीच बोले,
“ प्रेम होते तुझे खरे,
म्हणूनच केलास त्याग बरे ”