हीच आहे प्रित

डोळ्यासमोर सारखी उभारते एक मूर्त,
उभारण्याआधी नाही बघत कोणताही मुहूर्त,
सोबतच येतात तिच्या विषयी अनेक विचार,
ज्याने बदलून जातात माझे आचार.

संध्याकाळी जेंव्हा वाढते आई जेवण,
हाती घेऊन घास विसरतो कसे करावे सेवन,
हे पाहून चिंतित होऊन हलवते आई,
मग मात्र होते जेवायची एकच घाई.

कॉलेज सुटल्यावर रस्ताही चुकतो,
तिच्या घरासमोर झाडाखाली संध्याकाळपर्यंत टिकतो,
मग तिच्या घरच्यांना येतो राग,
जवळ येऊन बोलतात रस्त्याला लाग.

सरांना ही प्रश्न मोठा पडलाय,
याचा अभ्यासाचा घोडा कुठे अडलाय,
शेवटी सांगतात मस्ती पुरे झाली अभ्यास कर,
कसे सांगू संध्याकाळ पर्यंत दिसतच नाही मला घर.

भलत्याच चिंतेत आहे बहीण,
म्हणते मी तुझ्याच आज्ञेत राहीन,
का विसरलास तू आपल्यातील मस्करी,
सांगू नाही शकलो “तुझ्या भावाचीच झाले तस्करी”.

बाबांना नाही ओरडावे लागत,
कारण सध्या मी नाहीच टीव्ही बघत,
त्यामुळे तेच म्हणतात किमान बघ समाचार,
काय सांगू बाबा सध्या नशिबच घेतोय माझा समाचार.

मित्रांनाही याचे थोडे वाटले नवल,
पण त्यातील कोणीच नसावा हृदयाच्या जवळ,
जो तो गात होता टिंगलीचे गीत,
मी ही नाही संगितले “हीच आहे प्रित”.